Pak Defense Minister On Bangladesh । बांगलादेशातील परिस्थिती सर्वांनाच माहीत आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडला, मात्र असे असूनही आंदोलने थांबत नाहीत. अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्त्यांवर तसेच अल्पसंख्याक हिंदूंवर होणारे हल्ले थांबत नाहीत, तर दरम्यान या सर्व परिस्थितीवर पाकिस्तानचे मोठे वक्तव्य समोर आलंय.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी बांगलादेशातील परिस्थितीवर भाष्य केले आहे. आसिफ यांनी बोलताना, बांगलादेशातील सत्ता परिवर्तनाचे आम्ही स्वागत करतो. बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे आणि त्याचे प्रमुख डॉ. मोहम्मद युनूस आहेत, ज्यांनी हिंसाचार संपवण्याचे आवाहन केले होते, परंतु पाकिस्तान याकडे संधी म्हणून पाहत आहे.
दोन्ही देशांमधील नवीन संबंधांची सुरुवात Pak Defense Minister On Bangladesh ।
एका हिंदी वर्तमानपत्रानुसार, “पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बांगलादेशातील सत्तापरिवर्तनाबद्दल सांगितले की, ही दोन्ही देशांमधील नवीन संबंधांची सुरुवात आहे. जुने ताणले गेलेले संबंध दूर करून बांगलादेशशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.
भारत समर्थित सरकार संपुष्टात आले Pak Defense Minister On Bangladesh ।
पुढे बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले की, शेख हसीना यांचे सरकार बांगलादेशात १५ वर्षे राहिले. या काळात भारताचा प्रभावही तिथे खूप जास्त होता. भारत समर्थित सरकार संपुष्टात आले आहे.” असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा भारतावर टीका केली.
संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, “आज जी परिस्थिती बांगलादेशात आहे तीच परिस्थिती पाकिस्तानमध्येही आहे. पाकिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीबाबत ते म्हणाले की, लवकरच आर्थिक संकट दूर होईल आणि देशाची प्रगती होईल.”असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.