fbpx

‘हाफिझ सईद’च्या आणखी दोन साथीदारांना ‘तुरुंगवास’

लाहोर – जमात उद दावाचा म्होरक्‍या आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिझ सईदच्या आणखी दोन साथीदारांना पकिस्तानातील न्यायालयाने टेरर फंडिंग प्रकरणी तुरुंगवास सुनावला आहे.

लाहोरमधील दहशतवाद विरोधी न्यायलयाने “जेयुडी’चे नेते असलेल्या मुहम्मद अशर्रफ अणि ल्युकमन शाह यांना अनुक्रमे 6 आणि साडे पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. “एटीसी’चे न्यायाधीश अरशद हुसेन भुट्टा यांनीही या प्रत्येकाला दहा हजार रुपये दंडही ठोठावला आहे.

गुरुवारी “एटीसी’ने हाफिझ सईदला टेरर फंडिंगच्या आरोपाखाली 10 वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच हाफिझ सईदच्या जफर इक्‍बाल आणि याह्या मुजाहिद या आन्य दोन नेत्यांनाही प्रत्येकी साडे 10 वर्षांची शिक्षा सुनवली. तर हाफिझ सीदचा मेव्हणी अब्दुल रेहमान मक्‍की यालाही याच प्रकरणात 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

संयुक्‍त राष्ट्राने हाफिझ सईदला यापूर्वीच आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले असून अमेरिकेने त्याच्यावर 1 कोटी डॉलरचे बक्षिसही जाहीर केले आहे. त्याला गेल्या वर्षी 17 जुलै रोजी “टेरर फंडिंग’च्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात “टेरर फंडिंग’च्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात त्याला 11 वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. सध्या हाफिझ सईद लाहोरच्या कोट लखपत कारागृहात आहे.

पाकिस्तान अजून तरी “ग्रे लिस्ट’मध्येच…
पाकिस्तानकडून दहशतवादी कारवायांना आळा घालण्याच्या उपाय योजनांवर “फायनान्शियल ऍक्‍शन टास्क फोर्स’मधील पाकिस्तानचे स्थान अवलंबून असणार आहे. विशेषतः जे दहशतवादी पाकिस्तानमध्ये उजळ माथ्याने हिंडत असतात, त्यांच्यावर पाकिस्तान काय कारवाई करतो, हे “एफएटीएफ’कडून बघितले जाणार आहे.

पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी विभागाकडे “जेयुडी’च्या नेत्यांविरोधातील 41 प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यापैकी 24 प्रकरणांवर सुनावणी झाली आहे. तर उर्वरित प्रकरणे अद्यापही “एटीसी’कडे प्रलंबित आहेत.

हाफिझ सईदविरोधातील आणखी 4 प्रकरणांवर सुनावणी होणे बाकी आहे. “एफएटीएफ’ने फेब्रुवारी 2021 पर्यंत पाकिस्तानला “ग्रे लिस्ट’मध्येच ठेवले आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या कारवाईचा आढावा घेऊन भविष्यातील स्थान ठरवण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.