नियंत्रण रेषा ओलांडून पाकड्यांचा भारतीय चौकीवर हल्ला; एक जवान शहीद

श्रीनगर : प्रचंड तोफगोळ्याच्या पार्श्‍वभूमीवर गुरूवारी रात्री सुमारे पाच तर सहा पाकिस्तानी सैनिक नियंत्रण रेषा ओलांडून जम्मू आणि काश्‍मिरमध्ये प्रवेश केला. पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्कराच्या चौकीवर गोळीबार केला.

पुंछ जिल्ह्यात कृष्णा घाटी क्षेत्रात नंगी टेकडी तेथे गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास या घटनेची सुरवात झाली. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर अंधाधूंद मारा चुरू केला. तो रात्री उशीरापर्यंत सुरू होता. या प्रचंड गोळीाबाराचा फायदा उठवत पाच ते सहा पाकिस्तानी जवान भारतीय हद्दीत घुसले. त्यांनी भारतीय चौकीजवळ येऊन प्रचंड गोळीबार केला. त्यात एक जवान शहीद झाला. हा जवान मराठा रेजिमेंटमधील होता.

पाकिस्तानी सैन्याने तोफगोळ्यांचा प्रचंड माऱ्याच्या सहाय्याने हे सैनिक भारतीय हद्दीत घुसले. त्यांनी चौकीवर गोळीबार केला. त्यामुळे परिस्थिती प्रचंड तणावपूर्ण बनली. युध्द सदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली. मात्र शूर भारतीय जवानांनी नचोख प्रत्यूत्तर दिले. काश्‍मिर खोऱ्यातील शांतता आणि सौहार्दाच्या वातावरणाला सुरूंग लावण्याच्या हेतूने हा हल्ला करण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार यावर्षी सप्टेंबे पर्यंत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे तब्बल दोन हजार वेळा उल्लंघन केले आहे. त्यात 21 भारतीयांना प्राण गमवावे लागले.

शहीद बेळगावमधील
शहीद जवानाचे नाव राहूल भैरू सुलागेकर असे आहे. त्यांना गोळ्या लागल्यानंतर जखमीअवस्थेत जवळच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात नेण्यात आले. तेथे त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.

सुलागेकर हे कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील उचगावचे रहिवासी आहेत. त्यांच्या मागे त्यांची आई आहे.

राहुले हे निधड्या छातीचे शूर जवान होते. ते देशप्रमाच्या उच्च ध्येयाने प्ररीत होते. त्यांचे बलीदाम आणि सेवेविषयी असणारी निष्ठा देश कायम लक्षात ठेवेल, असे लष्कराच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)