एअर स्ट्राईकमध्ये २०० दहशतवादी ठार झाल्याची पाक सैन्याची कबुली; सामाजिक कार्यकर्त्याचा दावा 

वॉशिंग्टन – अमेरिकास्थित गिलगिटचे सामाजिक कार्यकर्ते सेंगे हसनान सेरिंग यांनी एका व्हिडिओद्वारे धक्कादायक दावा केला आहे. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर २०० दहशतवाद्यांचे मृतदेह पाकिस्तानी सैन्याने बालाकोटमधून खैबर पख्तूनख्वा येथे नेले असल्याचा दावा सेरिंग यांनी केला. यासंदर्भात एका उर्दू वृत्तपत्रात वृत्तही प्रसिद्ध झाले आहे.

सेरिंग यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत त्याला कॅप्शन दिली कि, भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांनी २०० पेक्षा अधिक मृतदेह दफन केल्याचे कबूल केले आहे. या व्हिडिओमध्ये काही पाकिस्तानी अधिकारी रडणाऱ्या लहान मुलांचे सांत्वन करताना दिसत आहे. दरम्यान या व्हिडिओला कोणताही अधिकृत दुजोरा नाही.

दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. यानंतर भारताने पाकिस्तानवर एयर स्ट्राईक करत दहशतवादी तळांना लक्ष केले. यामध्ये २०० हुन अधिक दहशतवादी मारले असल्याचा दावा भारताने केला असून पाकिस्तान मात्र सातत्याने खंडन करीत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×