नवी दिल्ली – खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ मंगळवार पासून देशात रंग उपलब्ध करणार आहे. हे रंग विषारी नसतील त्याच बरोबर बॅक्टेरियाविरोधी असतील. खादी प्राकृतिक पेन्ट असे या रंगाचे नाव असून या रंगाला ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डने प्रमाणित केले आहे. गाईच्या शेणापासून तयार केलेल्या या रंगाचा वास येत नाही.
हे रंग प्लास्टिक इमल्शन आणि डिस्टेंपर स्वरुपात उपलब्ध होतील. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. या रंगात जस्त, पारा, क्रोमियम, कॅडमियम अशा कुठल्याही धातूचा समावेश नाही. त्यामुळे रंग क्षेत्रात भारत पूर्णपणे स्वावलंबी होऊ शकेल.
तसेच तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारा उत्पादन वाढविता येईल. यामुळे प्रत्येक गाईची उत्पादकता प्रत्येक वर्षाला 30 हजार रुपयांनी वाढेल, असा दावा खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाने काढलेल्या पत्रकात करण्यात आला आहे.