कांदिवलीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक ठप्प

मुंबई – करोनाच्या संकटात पावसानेही मुंबईत थैमान घालायला सुरुवात केली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून लोकल सेवाही ठप्प झाला आहेत. तर कांदिवलीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळी दरड कोसळली आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पश्चिम महामार्गावरील कांदिवली डोंगराचा काही भाग कोसळला असून मोठ्या प्रमाणात माती आणि दगडाचा ढिगारा रस्त्यावर आला आहे. यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तात्पुरती ही वाहतूक फाउंटन येथून वळवण्यात आली आहे. दरम्यान, महापालिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून दगड हटविण्याचे काम सुरु आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.