Terrorist Attack | Jammu Kashmir | shatrughan sinha : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. हल्ल्यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर दुसरीकडे सरकारने देखील पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली.
या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तनाविरुद्ध मोठे निर्णय घेतले. ज्यामध्ये पाणी, अन्न, व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे हा क्रूर दहशतवादी हल्ला झाला असून, सर्वच स्तरातून याचा निषेध व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले.
या घटनेबाबत सोशल मीडियावर समोर येणारे फोटो आणि व्हिडीओ हृदय पिळवटून टाकणारे आहेत. सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींनीही या हल्ल्याविरोधात, दहशतवादाविरोधात आवाज उठवला आहे. अशातच अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जेव्हा पत्रकार त्यांना पहलगाम हल्ल्याबद्दल प्रश्न विचारतो, तेव्हा ते त्याच्यावर भडकताना दिसत आहेत. त्याचसोबत त्यांनी या घटनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ‘प्रोपोगंडा वॉर’ (प्रचारकी युद्ध) म्हटलंय. व्हायरल व्हिडीओमध्ये शत्रुघ्न सिन्हा आधी विचारतात, “काय घटना घडली आहे?” त्यावर पत्रकार त्यांना सांगतो, “तिथे हिंदूंवर…” हे ऐकताच शत्रुघ्न त्याच्यावर भडकतात आणि म्हणतात,
View this post on Instagram
“हिंदू हिंदू काय म्हणताय? तिथे हिंदू-मुस्लीम सर्व भारतीय आहेत. ही गोदी मीडिया प्रमाणापेक्षा जास्तच चालवतेय. आमचे मित्र माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या गटाकडून हे प्रचारकी युद्ध जास्तच चालवलं जातंय. हे अती होतंय. हा मुद्दा संवेदनशील आहे हे मला मान्य आहे. त्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे.
आपण असं कोणतंच वक्तव्य करू नये किंवा काही करू नये, ज्यामुळे तणाव आणखी वाढेल. सध्या जखमींवर औषधोपचाराची गरज आहे.” असं ते बोलताना दिसतात, सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल असून नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत,