‘पागलपंती’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित

मुंबई – ‘पागलपंती’ या आगामी चित्रपटातील कालाकारंचे लूक नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. हा चित्रपट एक मल्टिस्टारर चित्रपट असून यामध्ये जॉन अब्राहम, अर्शद वारसी, इलियाना डिक्रुझ, क्रिती खरबंदा, उर्वशी रौतेला, सोरभ शुक्ला, अनिला कपूर, या कालाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक अनिस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटाचे पहिले पोस्टर देखील काल प्रदर्शित करण्यता आले, आता उद्या या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर याबाबत माहितीही शेअर करण्यात आली आहे.

कॉमेडी ड्रामा असलेल्या ‘पागलपंती’ चित्रपटातील या सर्व कलाकारांचे फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आले आहेत. हे अतरंगी लूक पाहून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पहायला मिळत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रत्येक पोस्टरमध्ये प्रत्येक कलाकाराचे पात्र नेमके कसे आहे, याची झलक पाहायला मिळते. प्रत्येकजण यामध्ये ‘पागलपंती’ करताना दिसतो.’दिमाग मत लगाना क्योंकी इनमे है ही नही’, अशी टॅगलाईन असलेलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.