नगर – पद्मशाली समाजामध्ये गेले कित्येक वर्षांपासून बागल पांडुगू हा सण म्हणजेच बागेचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र, करोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता हा सण पाद्मशाली समाजाने घरामध्ये राहून साजरा करावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केले आहे.
नगर शहरांत बागल पांडुगू सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या सणासाठी बाहेगावहून खास नगर येथे पाहुणे येतात. सध्या करोना विषाणू मुळे संपूर्ण जग अशांत झाले असून, त्याचा परिणाम नगर शहारा मध्ये ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
अशा परिस्थिती मध्ये पाद्मशाली समाजाने हा सण घरा मध्ये राहूनच घरातील देव देवतांना नैवद्य ठेवून साजरा करावा. तसेच प्रत्येकाने प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन करावे. या सणाचे दिवशी तोफखाना व बालिकाश्रम रोड या दोन्ही मंदिरा मध्ये यात्रा भरणार नाही, हे या पूर्वीच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
तसेच सणाचे औचित्य साधून प्रत्येक कुटुंबाने एक रोप लावून त्याची निगा राखावी असे आवाहन बोज्जा यांनी केले.