नगर -महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन मधील पाइपलाइन रोडवरील काही भाग व पद्मा नगर चा परिसरात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हा परिसर हॉट स्पॉट म्हणून घोषीत करण्यात आला आहे.
दरम्यान, बुधवारी (दि.1) सायंकाळी महानगरपालिके चे आयुक्त श्रीकांत मायकलवार शहर अभियंता सुरेश इथापे, आरोग्य अधिकारी डॉ सतीश राजूरकर, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्रिंबके, विनीत पाऊलबुद्धे आदींनी या परिसराची पाहाणी केली.
यावेळी प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची तपासणी करून, करोनाची लक्षणे दिसून आलेल्या व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता आता करोनाच्या सोबत जगून लढायचे आहे. स्वतः स्वतःचे रक्षक होऊन मात करण्यासाठी मास्क वापरून सुरक्षित अंतर ठेवून काळजी घ्यावी असे, आवाहन निखिल वारे यांनी केले.