पद्मनाभ जोशी इलेव्हन संघ अंतिम फेरीत

पुणे: साई-9 स्पोर्टस आयोजित तिसऱ्या शरदचंद्रजी पवार प्रौढ क्रिकेट करंडक ट्‌वेन्टी-20 स्पर्धेत पद्मनाभ जोशी इलेव्हन संघाने साखळी फेरीतील तीन सामने सलग जिंकत अंतिम फेरीतील आपला प्रवेश निश्‍चित केला.

नेहरू स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत श्रीपाद भागवत याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पद्मनाभ (नाना) जोशी इलेव्हन संघाने सदाशिव शिंदे इलेव्हन संघाचा 43 धावांनी सहज पराभव केला. जोशी इलेव्हन संघाने निर्धारीत 20 षटकात 5 गडी गमावून 178 धावा केल्या. आनंद दळवी 63, श्रीपाद भागवत नाबाद 31 आणि कपिल लघाटे 19 यांच्या फलंदाजीच्या जोरावर जोशी संघाने स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.

या आव्हानाचा पाठलाग करताना सदाशिव शिंदे इलेव्हन डाव 135 धावांत संपुष्टात आला. शिरीष कामठे याने 72 धावा करून एकहाती लढा दिला. सामनावीर श्रीपाद भागवत याने 18 धावात 4 गडी टिपले.

खिरीड याच्या अष्टपैलू खेळीमुळे पद्मनाभ (नाना) जोशी इलेव्हनने रेगे इलेव्हनचा 6 गडी राखून सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. रेगे इलेव्हन संघाचा डाव 18.3 षटकात 123 धावांवर संपुष्टात आला. खिरीड याने 21 धावात 3 गडी बाद केले. हे आव्हान पद्मनाभ (नाना) जोशी इलेव्हन संघाने 17 षटकात 4 गडी गमावून पूर्ण केले.

Leave A Reply

Your email address will not be published.