पद्मभूषण राम सुतार यांनी देशाचा गौरव वाढविला – मोदी 

राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार प्रदान 

नवी दिल्ली – जगातील सर्वात उंच असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारून प्रसिध्द शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांनी भारत देशाचा गौरव वाढविला आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राम सुतार यांचा गौरव केला. शिल्पकलेच्या माध्यमातून दिलेल्या बहुमूल्य योगदानासाठी महाराष्ट्राचे सुपूत्र ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज प्रतिष्ठेचा “टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कार्यातून भारतीयांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ केली. सुतार यांनी सरदार पटेलांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारून पटेलांचा एकतेचा संदेश जगभर पोहचविला आहे. त्यांच्या कार्याच्यामाध्यमातून भारत देशाचा गौरव वाढला आहे. ज्या गुरुदेव रविंद्रनाथ टागौर यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येत आहे. त्यांनी आपल्या साहित्य व कलेच्या योगदानातून भारतीयांमध्ये जनगनमनची भावना जागवली, तर सदरदार पटेलांनी गुरुदेवांच्या याच विचारांना बळकटी दिली. त्यामुळे पद्मभूषण राम सुतार हे गुरुदेव रविंद्रनाथ टागौर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांना जोडणारा सेतू असल्याचेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.  तत्पूर्वी, याच कार्यक्रमात 2014 चा टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार प्रसिध्द मनिपुरी नर्तक राजकुमार सिंघजीत सिंह आणि 2015 साठी बांग्लादेशातील छायानट या सांस्कृतिक केंद्राला प्रदान करण्यात आला. 1 कोटी रूपये मानपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.