‘पडळकर माफी मागा अन्यथा कोल्हापूरी हिसका दाखवू…’

'गोपीचंद पडळकर म्हणजे धनगर समाजाला लागलेला शाप'

कोल्हापूर/प्रतिनिधी- आपली लायकी आणि कुवतीपेक्षा जास्त वायफळ बडबड करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी तातडीने शरद पवारसाहेबांची माफी मागावी. अन्यथा त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

या पत्रकावर जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप उर्फ भैय्या माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ, सरचिटणीस अनिल साळुंखे आदींच्या सह्या आहेत.

निवेदनात पुढे म्हटले आहे, मुळात गोपीचंद पडळकर यांनी वापरलेली खालच्या पातळीवरील भाषा ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कलंकच आहे. पडळकर यांचे जेवढे वय आहे, त्याच्या दुप्पट वर्ष पवारसाहेबांनी राजकारण, समाजकारण आणि बहुजनांच्या कल्याणार्थ खर्च केली आहेत. त्यांची ही भाषा आणि प्रवृत्ती म्हणजे सूर्यावर थुकण्याचाच प्रकार आहे.

शरद पवारसाहेब यांच्यावर बोलताना त्यांनी आपलं वय, सामाजिक कर्तुत्व आणि समाजकारण- राजकारणातील योगदान किती, याचेही भान ठेवायला हवं होतं. गोपीचंद पडळकर यांचे आत्ता जे वय आहे, त्या वयात शरद पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. उभी हयात त्यांनी महाराष्ट्राच्या आणि विशेषता बहुजन समाजाच्या विकासासाठी खर्च केली आहे.


गोपीचंद पडळकर म्हणजे धनगर समाजाला लागलेला शापच….

गोपीचंद पडळकर यांनी आमदारकीसाठी समस्त धनगर समाजाशी प्रतारणा केली. धनगर समाजाला वाऱ्यावर सोडून त्यांनी त्यांचा घोर विश्वासघात केला. त्यांनी केलेल्या धनगर समाजाच्या या विश्वासघाताची आणि प्रतारणा यांची नोंद इतिहासात होईल, एवढं मोठं काम त्यांनी केलंय. म्हणूनच गोपीनाथ पडळकर गोपीचंद पडळकर हा एक समस्त धनगर समाजावर लागलेला शापच आहे.
***

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.