पाचगणी – पाचगणी येथून पुण्याकडे निघालेली कार (एमएच-09-डीएम-5303) महाबळेश्वर-वाई रस्त्यावर पाचगणी पोलीस ठाण्याच्या समोर वडाच्या झाडावर धडकून शरण्या या दीड वर्ष वयाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.
या अपघातात मयूर त्रिंबक कोटस्थाने (वय 40) व आदिती मयूर कोटस्थाने (वय 35) हे दाम्पत्य जखमी झाले आहे. या अपघातात शरण्या ही गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर पाचगणीतील बेल एअर रुग्णालयात उपचार सुरू असताना, तिचा मृत्यू झाला.
याबाबतची खबर डॉ. अभय श्रीहरी देशपांडे (वय 56, रा. उत्कर्ष, बी रोड, पाचगणी) यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात दिली. सहाय्यक फौजदार माने तपास करत आहेत.