पाबळमध्ये किरकोळ कारणातून मारहाण

दोन महिलांसह सहा जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

शिक्रापूर – पाबळ (ता. शिरूर) येथे रस्त्याने जात असताना झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर मारामारीत झाले. यामध्ये दोन्ही गटांच्या युवकांनी एकमेकांना मारहाण केली. शिक्रापूर पोलिसांनी दोन्ही बाजूने गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत विदुर सुदाम रायकर व सचिन कैलास बगाटे (दोघे रा. पाबळ, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दिली. शिक्रापूर पोलिसांनी सचिन कैलास बगाटे, अजित कैलास बगाटे, विदुर सुदाम रायकर, मकरंद वालझडे, सारिका राजेंद्र गायकवाड, प्रगती राजेंद्र गायकवाड (सर्व रा. पाबळ) यांच्यावर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

पाबळ येथील विदुर रायकर व मकरंद वालझडे हे दोघे दुचाकीवरून जात असताना सचिन बगाटे हा रस्त्यात आला आणि त्याने विदुर व मकरंद यांना “या रस्त्याने जायचे नाही, तू गावात दादागिरी करतो, तुला घरात घुसून मारील’ असे म्हणून सचिन व त्य सोबतच्यांनी दमदाटी व मारहाण केली असल्याचे विदुर रायकर याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

तर सचिन बगाटे याने दिलेल्या फिर्यादीत विदुर व मकरंद व दोघी महिला यांनी सचिनला मारहाण करत दमदाटी केली असल्याचे सचिनने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर खिलारे व राजेंद्र बनकर हे करीत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×