Jaideep Ahlawat I ‘पाताल लोक’ ही वेबसिरिज 2020मध्ये सुपरहिट ठरली होती. यातील अभिनेता जयदीप अहलावतच्या भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले होते. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या या सिरिजची कथा अनेकांच्या पसंतीस पडली होती. या मालिकेचा पहिला सीझन खूपच जबरदस्त होता, त्यानंतर आता त्याचा दुसरा सीझन येणार आहे.
शेअर केलेल्या पोस्टरमध्ये अभिनेता जयदीप अहलावत दिसत आहे. त्याच्या डोळ्यासमोर एक मोठा चाकू दिसत असून त्यावर रक्ताचे डाग आहेत. या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. पोस्टर पाहून लोक अंदाज लावत आहेत की यावेळी ही मालिका खूप धमाकेदार असणार आहे.
जवळपास 5 वर्षांपासून लोक या मालिकेची वाट पाहत आहेत. आता लवकरच या मालिकेच्या चाहत्यांना तिचा पुढचा सीझन पाहता येणार आहे. या वेब सीरिजच्या घोषणेच्या पोस्टमध्ये, “हातोड्याचा वापर करून इंटरनेट ब्रेक करणार आहोत, पाताल लोकचा नवा सीझन लवकरच येणार आहे”, असे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
‘पाताल लोक’च्या पहिल्या सीझनच्या यशामध्ये जयदीप अहलावतची भूमिका महत्त्वाची ठरली होती. यात जयदीपने साकारलेला इन्स्पेक्टर हातीराम चौधरी हे एका उच्चस्तरीय खटल्याचा तपास करताना दिसतो. तर दुसऱ्या सीझनसाठीची कास्ट अजून स्पष्ट करण्यात आलेली नाही. पहिल्या सीझनमध्ये जयदीप अहलावत आणि इश्वाक सिंग यांच्या भूमिका होत्या.
‘पाताल लोक’ची कथा तरुण तेजपाल यांच्या २०१० मध्ये आलेल्या ‘द स्टोरी ऑफ माय असॅसिन्स’ या कादंबरीवर आधारित आहे.