पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ति चिदंबरम यांना तामिळनाडुमधून लोकसभा निवडुकीसाठी उमेदवारी

काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ति चिदंबरम यांना काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कार्ति चिदंबरम हे लोकसभा निवडणुकीत तामिळनाडुमधील शिवगंगामधून येथून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रसंगी बोलताना कार्ति चिदंबरम यांनी, “माझा विश्वास आहे की पक्षाची शक्ती आणि गठबंधन मला शिवगंगा येथून जिंकण्यात मदत करेल”,असे मत व्यक्त केले. तसेच ही आपली निवडणुक लढवण्याची दुसरी वेळ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

एअरसेल मॅक्‍सिस प्रकरणी कार्ति चिदंबरम हे सध्या जामिनावर बाहेर असून  “ईडी’ने 2011 साली तर “सीबीआय’ने 2012 साली कार्ति चिदंबरम यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले होते. पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री असताना एअरसेलमधील गुंतवणूकीसाठी मेसर्स ग्लोबल कम्युनिकेशन होल्डिंग सर्व्हिस लिमिटेड कंपनीला “फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डा’ची मंजूरी कार्ति यांच्यामुळे मिळाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.