ज्या इमारतीचे उदघाटन केले तिथेच आरोपी म्हणून आले चिदंबरम

नवी दिल्ली – सीबीआयने बुधवारी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांना अटक करत सीबीआयच्या मुख्यालयातील तळ मजल्यावरील अतिथी गृहातील सुट नंबर 5 मध्ये ठेवण्यात आले. यानंतर गुरूवारी त्यांना विशेष सीबीआय कोर्टात हजर केले. विशेष म्हणजे

सीबीआयचे हे तेच मुख्यालय आहे ज्या इमारतीच्या उदघाटनावेळी चिदंबरम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 2011 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सीबीआयच्या अत्याधुनिक मुख्यालयाचे उदघाटन केले होते. त्यावेळी चिदंबरम हे देखील उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यावेळी चिदंबरम हे केंद्रीय गृहमंत्री होते. मात्र, बुधवारी त्यांनाच अटक करुन त्याच इमारतीत ठेवण्यात आले. तेव्हा मनमोहन सिंग यांनी म्हणाले होते की, ही एक प्रभावी रचना आहे आणि मी त्या सगळ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो ज्यांनी त्याच्या निर्मितीत हातभार लावला आहे. मला खात्री आहे की ही नवीन इमारत आपल्या सर्वांना काम करण्यासाठी आरामदायी असे स्थान प्रदान करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)