पी. चिदंबरम सात दिवसांसाठी ईडीच्या कोठडीत

नवी दिल्ली: कॉंग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना गुरुवारी पुन्हा राऊस व्हेन्यू कोर्टात धक्का बसला. कोर्टाने चिदंबरम यांना ईडीच्या ताब्यात पाठवले आहे. चिदंबरम यांना 24 ऑक्टोबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या सात दिवसांच्या कोठडीत पाठविण्यात आले.

कोर्टाने त्यांना भोजन, पाश्चात्य शौचालय आणि औषधे वापरण्याची परवानगी दिली. तसेच त्यांना वेगळ्या कक्षात ठेवले जाईल. यापूर्वी सीबीआयने दाखल केलेल्या आयएनएक्स मीडिया प्रकरणात कोर्टाने गुरुवारी चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत मुदतवाढ दिली.

सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ केली. अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची सुनावणीही झाली. संचालनालयाने चौकशीसाठी चिदंबरम यांची 14 दिवसांची कोठडी मागितली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.