रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा अखंड सुरू राहावा

उपमुख्यमंत्री अजित पवार : हलगर्जीपणा खपवून घेणार नाही

पुणे –करोनाच्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, त्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. करोना संसर्ग रोखण्यासाठी तसेच बाधितांवर उपचार करण्यासाठी उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरातील करोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला.

 

यावेळी पुणे जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. करोनाच्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा व कुठलीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करावे, करोना उपाययोजनांची प्रत्येक माहिती लोकप्रतिनिधींसह रुग्ण व सर्वसामान्यांना मिळण्यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये अद्ययावत नोंदी करण्याबरोबरच बेड उपलब्ध करुन देण्याचे नियोजन जबाबदारीपूर्वक करावे, अशा सूचनाही पवार यांनी केल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.