वैद्यकीय ऑक्‍सिजनच्या पुरवठ्याबद्दल दर निश्‍चिती

नवी दिल्ली- देशात कोविड-19 च्या साथीच्या पार्श्‍वभुमीवर वैद्यकीय ऑक्‍सिजन पुरेशा प्रमाणात आणि किफाय्तशीर दरामध्ये उपलब्ध व्हावा यासाठी राष्ट्रीय औषध दर नियंत्रक अर्थात “एनपीपीए’ने पुढील सहा महिन्यांसाठी ऑक्‍सिजन सिएंडर आणि द्रवरुप ऑक्‍सिजनचे पुढील सहा महिन्यांसाठीच्या दरांवरील मर्यादा निश्‍चित केली आहे. ऑक्‍सिजनचा पुरवठा नियमित प्रमाणात आणि किफायतशीर दरामध्ये उपलब्ध व्हावा याबाबत केंद्र सरकारच्या सक्षम गट-2 ने याबाबत विचार केला आहे. त्यानुसार द्रवरुप वैद्यकीय ऑक्‍सिजनच्या किफायतशीर दरावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाच्या शिष्टमंडळाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली सर्व आवश्‍यक उपाय योजना करून तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

राज्यस्तरावरील वाहतुकीच्या किंमती निश्चित करण्यासाठी, सहा महिन्यांसाठी उत्पादकांना द्रव वैद्यकीय ऑक्‍सिजनची फॅक्‍टरी किंमत रोखण्यासाठी जीएसटी वगळता 15.22 रुपये प्रति घनमीटर आणि वैद्यकीय ऑक्‍सिजनची विद्यमान मर्यादा किंमत रुपये 17.49 प्रति घनमीटर ऐवजी जीएसटी वगळता एक्‍स फॅक्‍टरी किंमत 25.71 रुपये प्रति घनमीटर राहील, असे निश्‍चित करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.