प्राणायाम केल्याने ऑक्सिजन पातळी वाढते

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. या काळात तज्ज्ञ योग आणि प्राणायाम करण्याचा सल्ला देतात. प्राणायाम केल्याने ऑक्सिजन पातळी आणि प्रतिकारक शक्ती वाढते.

सध्या कोरोनाबाधित रुग्णांना प्राणायाम करण्याचा सल्ला देतात. प्राणायाम आपल्या प्रतिकारक शक्तीला वाढवते. परंतु,कोविडचे रुग्णांना अशक्तपणामुळे प्राणायाम करणे शक्य नसते. तरीही त्यांनी हळू-हळू प्राणायाम करायला पाहिजे. या मध्ये अनुलोम-विलोम सर्वात जास्त प्रभावी आहे. यामुळे फुफ्फुसे क्रियाशील होतात. नाडी शोधन प्राणायाम देखील फुफ्फुसांसाठी प्रभावी आहे.

प्राणायाम केल्याने ऑक्सिजनची पातळी वाढते –
प्राणायाम मध्ये अनुलोम-विलोम हे सर्वोत्तम आहे. या मुळे ऑक्सिजनची पातळी वाढते. घशात संसर्ग असल्यास उज्जयी प्राणायाम करू शकता या मुळे घशाची खवखव आणि कफ नाहीसे होतात.

मानसिक तणावाला कमी करण्यासाठी काय करावे ?
तणाव, नैराश्य किंवा मानसिक तणाव वाढल्यावर भ्रामरी प्राणायाम करू शकता. या मुळे नकारात्मक विचार,तणाव,कमी होऊ लागतात.

निरोगी लोकांनी कोणता प्राणायाम करावा ? जेणे करून कोरोनापासून वाचता येऊ शकेल.
जे लोक या आजारापासून लांब आहे त्यांनी सूर्यभेदी प्राणायाम करावे. या मध्ये उजवी कडून श्वास घेऊन डावी कडे सोडावे नंतर डावी कडून उजवी कडे सोडावे.

फुफ्फुसांना स्वच्छ करण्यासाठी कोणता प्राणायाम करावा-
या साठी कपालभाती आणि भ्रस्रिका प्राणायाम करावे. या मुळे फुफ्फुस स्वच्छ राहतात. हृदयविकाराच्या रुग्णांनी काळजीपूर्वक सल्ला घेऊन हे करावे.

मुलांनी कोणते योग करावे-
मुलांनी सूर्य नमस्कार करावे. या मुळे संपूर्ण शरीरात ताण येतो.हे सर्वात जास्त प्रभावी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.