करोनाची गंभीर लक्षणे असणाऱ्यांची संख्या आटोक्यात
पुणे – पुणे शहरात ऑक्सिजन बेड्स तसेच व्हेंटिलेटरअभावी गेल्या काही महिन्यांपासून करोनाच्या रुग्णांचा होणारा मृत्यू, ही चिंतेची बाब होती. आता मात्र चिंता करण्याची गरज नसून करोनाची गंभीर लक्षणे असणाऱ्यांची संख्या आटोक्यात आली असून परिणामी पुणे शहरात तब्बल 180 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी दिली.
व्हेंटिलेरची संख्याही समाधानकारक असून शहरातील 45 रुग्णालयांमधील स्थिती आता पूर्णपणे आटोक्यात आली आहे, असेही विक्रम कुमार यांनी नमूद केले. असाच ट्रेंड कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत पुण्याची स्थिती करोनामुक्तीच्या दिशेने होईल.
महापालिकेकडून विविध उपाययोजना वेळोवेळी सुरूच असून नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही कुमार यांनी सांगितले.