आता कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्‍सिजन बेड

चार सेंटर कार्यान्वित : आणखी सेंटर सुरू करण्याची तयारी

पुणे – शहरातील करोना बाधितांची संख्या हजारोंनी वाढत असून, त्यात गंभीर रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना तसेच श्‍वास घेण्याला त्रास होत असलेल्या रुग्णांना बेड मिळण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महापालिकेनेच आता आयसोलेशन सेंटर्समध्ये ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था केली आहे.

महापालिकेच्या विविध कोविड केअर सेंटर (सीसीसी)मध्ये 150 ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. या अनुषंगाने तीन सेंटरमध्ये 70 बेडची व्यवस्था करण्यात आल्याचे आरोग्य प्रमुख डॉ. आशीष भारती यांनी सांगितले.

महापालिकेने रक्षकनगर, खराडी (250 बेड), बनकर शाळा, हडपसर (300 बेड), संत ज्ञानेश्‍वर वसतीगृहात, येरवडा (500), आणि गंगाधाम चौक येथे (200 बेड) अशा चार सीसी सेंटर सुरू केली आहेत. रक्षक नगर, बनकर आणि संत ज्ञानेश्‍वर वसतीगृहातील सर्व बेड फुल्ल असून गंगाधाम येथे 70 रुग्ण आहेत.

गरज पडल्यास बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, सिंहगड महाविद्यालय वसतीगृह, कृषी महाविद्यालय, कर्वे नगर येथील मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालय, येरवडा येथील आंबेडकर वसतीगृह, घोले रस्ता येथील आंबेडकर वसतीगृह, कोंढवा येथील ट्रिनीटी महाविद्यालय वसतीगृह, औंध आयटीआय आदी ठिकाणी केअर सेंटर सुरू करण्याची तयारी महापालिकेने केली आहे.

हापालिकेने आयसोलेशन सेंटरमध्ये 150 ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बनकर शाळेत 30, रक्षक नगर येथे 20 आणि संत ज्ञानेश्‍वर वसतीगृहात 20 असे 70 ऑक्‍सिजन बेड कार्यान्वित करण्यात आले आहेत. गरज लागेल तशी या बेडची संख्या वाढवण्यात येणार आहे.

– डॉ. आशिष भारती, आरोग्यप्रमुख, मनपा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.