शेतकऱ्यांना 50 टक्‍के अनुदानावर बैलजोडी; अजित पवार यांच्या हस्ते वितरण सोहळा

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदानावर शेतकऱ्याला बैलजोडी देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवन येथे हा बैलजोडी वितरण सोहळा पार पडला. 

यावेळी कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, आमदार सुनील शेळके, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, बांधकाम सभापती-प्रमोद काकडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, महिला बालकल्याण सभापती पूजा पारगे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजीराव विधाते, जिल्हा कृषी अधिकारी अनिल देशमुख उपस्थित होते.

मावळ तालुक्‍यातील मानाजी बबन खांदवे यांना 50% अनुदानावर वैयक्तिक लाभ योजनेच्या अंतर्गत बैलजोडीचे वितरण करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांना 5 एकरच्या आत शेतजमीन आहे, तसेच ज्यांच्याकडे ट्रॅक्‍टर नाही असे शेतकरी या योजनेच्या अंतर्गत पात्र धरण्यात आलेले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.