पिंपरी – घराबाहेर सोडलेल्या श्वासाने सात वर्षीय मुलीचा चावा घेतल्या प्रकरणी मालकास अटक करण्यात आली आहे. जुनी सांगवी येथील जयमाला नगरमध्ये शुक्रवारी (दि. 25) हा प्रकार घडला.
संजय विनायक पवार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जोत्स्ना राजकुमार इंगोले यांनी फिर्याद दिली आहे.
इंगोले यांची सात वर्षांची मुलगी तिच्या वडिलासोबत फोनवर बोलत होती. त्या वेळी पवार यांनी त्याचे पाळलेले तीन श्वान घराबाहेर सोडले. त्यातील एका पांढऱ्या व सोनेरी रंग असलेल्या श्वासाने मुलीच्या उजव्या पायाचा चावा घेतला.