Owaisi Slogan Controversy । ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेते असदुद्दीन ओवेसी यांनी काल लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने घोषणाबाजी करत ”जय फिलीस्तीन’ म्हटले. त्यांच्या याच घोषणेवरून सध्याबराच वाद झाला आहे. हे प्रकरण एवढे वादातीत बनले आहे कि त्यांचे लोकसभा सदस्यत्व गमावण्यापर्यंत पोहोचले आहे. ओवेसी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यासाठी राष्ट्रपतींकडे तक्रार करण्यात आलीय.
हैदराबादमधून विक्रमी पाचव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले ओवेसी यांनी उर्दूमध्ये शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी त्यांनी प्रार्थना केली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी ‘जय भीम, जय मीम, जय तेलंगणा आणि ‘जय फिलीस्तीन”च्या घोषणा दिल्या. ओवेसींच्या या घोषणाबाजीनंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला. यानंतर सभापतींनी ते रेकॉर्डवरून काढून टाकण्याचे निर्देश दिले. प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब यांनी, असदुद्दीन ओवेसी यांच्या शपथेचा मूळ मजकूर रेकॉर्डमध्ये नोंदवला जात आहे.असे त्यांनी यावेळी सांगितले.
‘ओवेसी यांना अपात्र ठरवावे’ Owaisi Slogan Controversy ।
त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी, ‘एआयएमआयएम खासदार ओवेसी यांच्याविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ओवेसी यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवावे, अशी मागणी त्यांनी करण्यात आली आहे.
“हरि शंकर जैन यांनी भारताच्या राष्ट्रपतींसमोर असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात भारतीय राज्यघटनेच्या कलम १०२ आणि १०३ नुसार तक्रार दाखल केली असून, त्यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवण्याच्य=इ मागणी केली आहे,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे .
असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले बचावात? Owaisi Slogan Controversy ।
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही शपथविधीदरम्यान झालेल्या घोषणाबाजीबाबत आपली बाजू मांडली. संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना ओवेसी म्हणाले की, मी सभागृहात ”जय फिलीस्तीन” म्हटले होते. “इतर सदस्यांनीही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. मी जय भीम, जय मीम, जय तेलंगणा, ‘जय फिलीस्तीन’ म्हणालो. हे चुकीचे कसे असू शकते. मला संविधानातील तरतुदी सांगा? इतरांनीही काय म्हटले आहे. महात्मा गांधींनी पॅलेस्टाईनबद्दल कायसांगितले ते वाचले पाहिजे.असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा
लोकसभेनंतर आता विधान परिषदेचा उडणार धूराळा; चार जागांसाठी आज होणार मतदान