औरंगाबाद – सध्या एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची सोशल मीडियावर जोरदार हवा पाहायला मिळत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्यात औरंगाबादमधील पैठण गेट परिसरात ओवेसी यांची प्रचार सभा पार पडली. दरम्यान, या सभेतील ओवेसी यांचा एक व्हिडीओ शोषल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत जिन्यावरुन उतरत असलेले असदुद्दीन ओवेसी गाण्यावर नाचत असताना दिसत होते.
Maharashtra: AIMIM Chief Asaduddin Owaisi performs a dance step after the end of his rally at Paithan Gate in Aurangabad. (17.10.2019) pic.twitter.com/AldOABp2yd
— ANI (@ANI) October 18, 2019
दरम्यान, आता या डान्सवर ओवेसींनी खुलासा केला आहे. आपण नाचत नव्हतो. तर पक्षाचं चिन्ह असलेल्या पतंगाचा अभियन करून दाखवत होतो, असं ओवेसी म्हणाले. ‘माझ्या पक्षाचं चिन्ह पतंग आहे. आमच्या प्रत्येक सभेनंतर आम्ही पतंग उडवण्याचा अभिनय करून निवडणूक चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.