लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीपासून ते बसपा आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी तयारीला लागल्याचे दिसत आहे. दुसरीकडे एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी उत्तर प्रदेशात मुस्लिम-ओबीसी समीकरण बनवण्यासाठी सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठी सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर हे महत्त्वाचे भूमिका निभावत आहेत.
आज लखनऊ में @aimim_national राष्ट्रीय अध्यक्ष बैरिस्टर श्री @asadowaisi जी से शिष्टाचार मुलाकात की। pic.twitter.com/Fa1ivKAX4q
— Om Prakash Rajbhar (@oprajbhar) December 16, 2020
ओवेसी यांनी लखनौ येथे ओम प्रकाश राजभर यांची भेट घेतली. राजभर यांनी नुकतेच ओबीसी समुदायच्या आठ पक्षांनी एकत्र येत भाजपविरोधात संकल्प मोर्चा नावाने युती केली आहे. या मोर्चात ओम प्रकाश राजभर यांची सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (एसबीएसपी), बाबू सिंह कुशवाहा यांची अधिकार पार्टी, कृष्णा पटेल यांची अपना दल (के), प्रेमचंद्र प्रजापती यांची भारतीय वंचित समाज पार्टी, अनिल चौहान यांची जनता क्रांती पार्टी (आर) आणि बाबू राम पाल यांची राष्ट्र उदय पार्टी यांचा समावेश आहे.
एआयएमआयएम पक्ष देखील या युतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. कारण, ओवेसींनी राजभरसोबत बिहारमध्येही निवडणूक लढवली होती. यावेळी ओवेसी यांच्या पक्षाता पाच जागा मिळाल्या होत्या.
“आम्ही दोघेसोबत आहोत आणि आम्ही ओम प्रकाश राजभर यांच्या नेतृत्त्वासोबत आहोत आणि सोबत काम करु”, असं ओवेसी म्हणाले. इतकंच नाही तर त्यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष शिवपाल यादव यांच्यासोबतही युती करण्याचे संकेत दिले आहेत.