Owaisi Attack BJP-Congress । मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल मांडला येथे अवैध गोमांस व्यापाराविरुद्ध कारवाईचा एक भाग म्हणून ११ जणांच्या घरांवर बुलडोझर चालवला. ही घरे सरकारी जमिनीवर बांधल्याचा प्रशासनाचा दावा आहे.याच प्रकरणावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या कारवाईवर बोलताना ओवेसी यांनी, अन्यायाची प्रक्रिया थांबत नाही. निवडणूक निकालाच्या आधी आणि नंतरही मुस्लिमांची घरे पाडली जातात, मुस्लिमांच्या हत्या होतात.
ओवेसी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी,”2015 मध्ये एक जमावाने अखलाकच्या घरात घुसून त्याच्या फ्रिजमध्ये ठेवलेले मांस गोमांस समजून त्याची हत्या केली होती. ‘तस्करी’ आणि ‘चोरी’ असे खोटे आरोप करून किती मुस्लिमांची हत्या झाली कुणास ठाऊक.” असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.
अन्यायाचे चक्र थांबत नाही Owaisi Attack BJP-Congress ।
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “जे काम आधी जमाव करायचं ते आता सरकार करत आहे. मध्य प्रदेश सरकारने काही मुस्लिमांवर त्यांच्या फ्रीजमध्ये गोमांस ठेवल्याचा आरोप केला आणि 11 घरे बुलडोझ केली. अन्यायाचे चक्र थांबत नाही. निवडणूक निकालाच्या आधी आणि नंतरही मुस्लिमांची घरे पाडली जातात, मुस्लिमांच्या हत्या होतात. ज्यांना मुस्लीम मते चांगली मिळतात ते गप्प का आहेत? असा प्रश्न देखील यावेळी त्यांनी म्हटले आहे.
मांडल्यात बुलडोझर का चालवला? Owaisi Attack BJP-Congress ।
मंडलाचे पोलिस अधीक्षक (एसपी) रजत सकलेचा यांनी गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केल्याचे सांगितले होते. त्यांनी सांगितले की, “आम्हाला माहिती मिळाली होती की नैनपूरच्या भैसावाही भागात मोठ्या प्रमाणात गायी कत्तलीसाठी आणल्या गेल्या आहेत. यानंतर छापा टाकण्यात आला. एसपी सकलेचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासासाठी आलेल्या टीमला आरोपीच्या लपून बसलेल्या 150 गायी बांधलेल्या आढळल्या. सर्व 11 आरोपींच्या घरातील रेफ्रिजरेटरमधून गायीचे मांस जप्त करण्यात आले. एका खोलीतून प्राण्यांची चरबी, त्वचा आणि हाडे जप्त करण्यात आली. “स्थानिक सरकारी पशुवैद्यकाने जप्त केलेले मांस गोमांस असल्याची पुष्टी केली आहे. त्याचे नमुने डीएनए चाचणीसाठी हैदराबादला पाठवण्यात आले आहेत. 11 आरोपींची घरे सरकारी जमिनीवर असल्याने पाडण्यात आली.