चेन्नई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारच्या चेन्नाई भेटीच्या वेळी त्यांच्या विरोधात ट्विटरवर मोदी गो बॅक असा संदेश जारी करणारी तमिळ अभिनेत्री ओव्हीया हिच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी तमिळनाडु प्रदेश भारतीय जनता पक्षाने केली आहे.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या विरोधात कोर्टातही धाव घेतली आहे. पंतप्रधानांचा अवमान केल्याच्या कारणामुळे तिच्या विरोधात सायबर कायद्यांनुसार कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
ही अभिनेत्री तमिळ बीग बॉस कार्यक्रमामुळे अधिक लोकप्रिय झाली आहे. तिच्या या ट्विटर संदेशाला चीन आणि श्रीलंकेतून लाईक्स आले आहेत. त्यामुळे हा मोठा कट आहे असे भाजपच्या लोकांचे म्हणणे आहे.
भारताच्या एकात्मतेलाच त्यातून धोका निर्माण झाला आहे असे त्यांचे म्हणणे आहे. सदर अभिनेत्रीचा पत्रव्यवहार आणि तिच्या अन्य ऑन लाइन कनेकश्नचाही तपास करण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.