सातारा – जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि करोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 285 नागरिकांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. तसेच 360 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 20, कराड येथील 21, फलटण येथील 6, कोरेगांव येथील 22, वाई येथील 24, खंडाळा येथील 13, रायगांव येथील 44, पानमळेवाडी येथील 65, महाबळेश्वर येथील 21, दहिवडी येथील 29, खावली येथील 20, मायणी येथील 8, म्हसवड येथील 4, पिंपोडा येथील 4 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 59 असे एकूण 360 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.