सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये व करोना केअर सेंटर्समध्ये उपचार घेतलेल्या 19 नागरिकांनी करोनावर मात केली असून त्यांना रविवारी घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातून शिरवळ, ता. खंडाळा येथील 48 वर्षांचा पुरुष, वेळे, ता. वाई येथील 59 वर्षांचा पुरुष, फलटण करोना केअर सेंटरमधून वडले, ता. फलटण येथील 40, 89 व 30 वर्षे वयाचे पुरुष, 12 वर्षांचा मुलगा व एक वर्षाचे बाळ, पार्ले (ता. कराड) येथील करोना केअर सेंटरमधून तुळसण, ता. कराड येथील 50 व 22 वर्षे वयाच्या महिला, मायणी (ता. खटाव) येथील मेडिकल कॉलेजमधून सातेवाडी, ता. खटाव येथील 76 वर्षांची वृद्ध महिला, शिरवळ (ता. खंडाळा) येथील करोना केअर सेंटरमधून आसवली, ता. खंडाळा येथील 25 वर्षांचा पुरुष, वाई येथील करोना केअर सेंटरमधून पाचवड, ता. वाई येथील 52 वर्षांचा पुरुष, व्याजवाडी, ता. वाई येथील 58, 27 व 29 वर्षे वयाचे पुरुष, 39 वर्षांची महिला, 13 व 16 वर्षे वयाच्या युवती व आसरे, ता. वाई येथील 55 वर्षांचा पुरुष, या रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले
आहे.
74 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीला
दरम्यान जिल्हा रुग्णालयातील नऊ, कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील 11, शिरवळ करोना केअर सेंटरमधील दोन, रायगाव येथील नऊ, पानमळेवाडी येथील 34, मायणीतील नऊ, अशा एकूण 74 संशयित रुग्णांच्या घशातील स्रावांचे नमुने करोना चाचणीसाठी पुणे येथील एनसीसीएसकडे पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात आणखी 14 जण बाधित
पुणे येथील एनसीसीएस येथे करोना चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 14 नागरिकांच्या नागरिकांच्या घशातील स्रावांच्या नमुन्यांचे अहवाल काल (दि. 20) रात्री आले. हे रुग्ण करोनाबाधित असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. यामध्ये फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी (हिंगणगाव) येथील 61 व 32 वर्षे वयाचे पुरुष व 27 वर्षांची महिला, वडगाव (उंब्रज), ता. कराड येथील 28, 20 व 44 वर्षे वयाच्या महिला, वाकळवाडी, ता. खटाव येथील 35 वर्षांची महिला व 27 वर्षांचा युवक, खोकडे, ता. माण येथील 34 वर्षांचा युवक, जावळी तालुक्यातील म्हाते खुर्द येथील 54 वर्षांची महिला व 62 वर्षांचा पुरुष, केडांबे येथील 65 वर्षांचा वृद्ध, राजापुरी, ता. सातारा येथील पाच वर्षांची बालिका व 31 वर्षांची महिला यांचा समावेश आहे. त्या आधी शनिवारी दिवसभरात पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे कळविण्यात आले होते. त्यातील एकाचा अहवाल मृत्युपश्चात पॉझिटिव्ह आला होता.