विकएंडला जवळपास लाखाच्या पुढे दंड वसूल

भोर –  शनिवार – रविवार पर्यटक कोविड अंतर्गत नियमांचे उल्लंघन करून पर्यटनासाठी येतात, वीकएंड लॉकडाउन मध्ये कोणीही अत्यावश्यक कामानिमित्त व्यतिरिक्त बाहेर पडू नये, पडल्यास त्याला नियमानुसार दंड करण्यात येते, आज स्थितीला आम्ही जवळपास लाखाच्या पुढे दंड वसूल केला आहे, असे भोर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी प्रभातशी बोलताना सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळी 144 कलम लागू (Section 144 ) करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या क्षेत्रातील पर्यटन स्थळावर 144 कलम लागू (Pune News) केल्यामुळे पाच किंवा त्या पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याशिवाय धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर नागरिक गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले होते. पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यापर्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा या तालुक्यातील पर्यटन स्थळावर जमावबंदी आदेश लागू केले आहेत.

दरम्यान, पाल अजित पवार यांनी येत्या आठवड्यातही पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये निर्बंध कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पुणे जिल्ह्यात मागील आठवड्यातील नियम कायम ठेवण्यात आले होते, मात्र या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.

भोर तालुक्यात या ठिकाणी बंदी
वरंडा घाट, रोहडेश्वर/विचित्र गड, रायरेश्वर किल्ला, भाटघर धरण परिसर, निरादेवघर धरण, नागेश्वर मंदीर, आंबवडे, भोर राजवाडा, नारायणपुर मंदीर परिसर, पाणवडी घाट, बोपदेव घाट, दिवेघाट, मल्हारगड

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.