पुणे – करोना प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध होत असल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग आला आहे. आतापर्यंत 20 लाख 8 हजार 189 जणांचे लसीकरण झाले आहे. तर आठ दिवसांपूर्वी (दि. 7 जुलै) एकूण 17 लाख 794 जणांना लस देण्यात आली. त्या तुलनेत मागील आठ दिवसात तब्बल 2 लाख 28 हजार जणांचे लसीकरण झाले.
दरम्यान, आतापर्यंतच्या एकूण लसीकरणात 15 लाख 21 हजार 906 जणांनी पहिला, तर 4 लाख 86 हजार 283 जणांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.
मागील एक महिन्यातील लसीकरणाची परिस्थिती पाहिली तर, 9 जून रोजी ग्रामीणमध्ये 11 लाख 72 हजार 748 लाभार्थींचे लसीकरण पूर्ण झाले होते. लसीचा पुरेशा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे 16 जूनपर्यंत केवळ 34 हजार 397 लाभार्थींचे लसीकरण झाले. मात्र, त्यानंतर लसीचा पुरवठा हळूहळू सुरळीत होण्यास सुरवात झाल्यावर 16 ते 23 जूनदरम्यान, 1 लाख 73 हजार 371 लाभार्थींना लस देण्यात आली. 23 ते 30 जून दरम्यान 1 लाख 90 हजार 491 तर 1 ते 7 जुलै या आठवड्यात 1 लाख 30 हजार लाभार्थींना लस देण्यात आली आहे. तर 7 ते 14 जुलैमध्ये 2 लाख 28 हजार जणांचे लसीकरण झाले आहे. दरम्यान, सर्वाधिक लसीकरण हवेली तालुक्यात झाले आहे. यात पुणे शहरालगतच्या बऱ्याच भागाचा समावेश आहे.
येत्या काही दिवसांत केंद्र शासनाकडून लसींचा पुरवठा सुरळीत झाल्यास जिल्ह्यात लसीकरण मोहीम आणखी वेगाने होण्याची अपेक्षा आहे.
तालुकानिहाय पहिला आणि कंसात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या
हवेली-2,78,299 (1,04,196), खेड – 1,56,635 (37,666), मुळशी – 1,49,514 (45,496), मावळ – 1,43,251 (36,727), शिरूर – 1,24,427 (34,273), बारामती – 1,22,735 (42,033), जुन्नर – 1,15,390 (48,172), इंदापूर – 1,02,683 (27,339), आंबेगाव – 89,975 (31,686), दौंड – 81,800 (27,585), पुरंदर – 72,621 (24,297), भोर – 55,356 (17,688), वेल्हा – 29,220 (9,125).