इंडिया माय व्हॅलेंटाईन रविवारी मुंबईत

अभिनेत्री स्वरा भास्करने उलगडली संकल्पना

मुंबई : त्याच आवाजाच्या प्रतिध्वनीच्या बाहेर येऊन संवाद साधण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी 30 कलाकारांसह एकत्र येत देशात शांती आणि एकतेचा संदेश देण्यासाठी इंडिया माय व्हॅलेंटाईन या मोहीमेचा भाग होणार आहेत, असे अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी सांगितले.

स्वरा, निर्माती आदिती आनंद, कार्यकर्ते फाहद अहमद आणि मिताली भासीन यांनी इंडिया माय व्हॅलेंटाईनचे आयोजन दिल्लीत केले होते. त्याच कार्यक्रमाचे मुंबईत रविवारी आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची भूमिका सांगताना स्वरा म्हणाली, आक्रमक निदर्शने न करता जे द्वेषांच्या तत्वज्ञानावर विश्‍वास ठेवत नाही अशांना सामावून घेण्याची वेळ आली आहे.

प्रत्येक जण प्रतिध्वनींचा साठा बनले आहेत. लोकांना आधीच जे पटलंय तेच ते परत परत सांगत आहेत. आता त्याच्या बाहेर येण्याची वेळ आली आहे. वातावरण एवढे ध्रुवीकृत झाले आहे. ज्याला निदर्शने करायची आहेत तो निदर्शने करण्यासाठी जात आहे. मात्र द्वेषाचे तत्वज्ञान न स्वीकारणाऱ्या परंतु आक्रमक राजकारण आणि निदर्शनात स्वारस्य नसणारा एक मोठा जनसमुदाय आहे. या समुदायापर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे. आम्ही एकाच देशांत राहतो मग आणखी किती काळ एकमेकांवर चिखलफेक करणार? हा विचार यामागे आहे, असे ती म्हणाली.

ही चळवळ कोलकाता, चंदीगढ, हैदराबाद येथेही नेणार आहोत. त्यात सहभागी व्हावे म्हणून अभिनेता नसरूद्दिन शहा, रत्ना पाठक शहा, विशाल भारद्वाज, रेखा भारद्वाज, स्वानंद किरकिरे, आमीर आझीस सुमुखी सुरेश यांच्याशी संपर्क साधत आहोत.

लोक कदाचित निदर्शनासाठी येणार नाहीत पण ते सेलिब्रेशनसाठी येऊ शकतात. ते कदाचित राजकीय भाषणांसाठी येणार नाहीत, पण ते स्टॅंड अप आणि संगितासाठी येऊ शकतात. आपल्यात काय फूट पाडते आणि काय जोडते हे समजवण्याचे हे सौम्य पॅकेज आहे. आपल्या मुलाला आपण कुटुंबियांनंतर देशावर प्रेम करायला शिकवतो. त्याच प्रमाणे भारत हेच माझे पहिले प्रेम कसे बनेल, हा विचार यामागे आहे. इंडिया माय व्हॅलेंटाईन ही निदर्शने नव्हेत. तर ते एक सेलिब्रेशन आहे. जेथे विद्वेषाला कोणतीही जागा नसेल, असे तीने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.