जगभरात 23 लाखाहून अधिक रुग्ण; 1.60 लाख जणांचा बळी 

नवी दिल्ली : जगभरात 23 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे तर, 1 लाख 60 हजार 757 जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 193 देशात कोरोना विषाणूचे 23 लाख 30 हजार 964 कोरोनाचे  प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत जगात किमान 5 लाख 96 हजार 687 लोक कोरोना विषाणूपासून बरे झाले आहेत. चीनच्या वूहान प्रांतातून झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात पोहचला आहे. 

अमेरीकेत आतापर्यंत 39 हजार जणांचा मृत्यू
अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वाधिक गतीने झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 7 लाख 38 हजार 830 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 39 हजार14 लोकांचा मृत्यू झाला असून,68 हजार 275 जण कोरोनमुक्त झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 
 
इटलीत 23 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू 
इटली हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कोरोनामुळे प्रभावित असणारा देश आहे. इटलीत आतापर्यंत 23 हजार 227 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे, तर 1 लाख 75 हजार 925 जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. 
 
स्पेनमध्ये 1 लाख 94 हजार 416 जणांना कोरोनाची बाधा  
स्पेनमध्ये आतापर्यंत 20 हजार 639 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून,1 लाख 94 हजार 416 जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे.  
फ्रान्समध्ये 1 लाख 51हजार 793 जणांना कोरोनाचे संक्रमण झाले असून, 19 हजार 323 जणांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. तर ब्रिटनमध्ये 15 हजार 464 जणांचा बळी गेला असून, 1 लाख 14 हजार 217 जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. 
चीनमध्ये आतापर्यंत 4 हजार 632 मृत्यू

चीनमध्ये कोरोना विषाणूच्या बळींची संख्या  4 हजार 632 मृत्यू  वर पोहचली आहे तर,  82 हजार 735 जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तसेच इराणमध्ये कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या 5 हजार 31 वर पोहचली असून, संक्रमित लोकांची संख्या 80 हजार 860 वर पोहचली आहे.

युरोपियन देश सर्वाधिक प्रभावित

शनिवारी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे युरोपमध्ये मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या एका लाखांवर गेली.कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जगात झालेल्या मृत्यूंपैकी हि संख्या दोन तृतीयांश आहे. युरोपमध्ये कोरोना संसर्गाचे सुमारे 11 लाख प्रकरणाची नोंद झाली आहे तर, एका लाखापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.