पुणे –राज्य शासनात विलीनीकरण होण्यासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पाच महिने पूर्ण झाले. कोर्टाच्या निकालानंतर देखील कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा कायम आहे. पुणे विभागात आतापर्यंत दीड हजार कर्मचारी कामावर परतले असले तरी, अद्यापही विभागातील 2 हजारांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले आहे.
विभागातून सध्या राज्याच्या विविध भागात दैनंदिन 1 हजार फेऱ्या होत असून, एक लाख 25 हजार किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. शिवनेरी, शिवशाहीच्या बरोबरीने आता लालपरीचे संचलन सुरू झाल्याने प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. विभागात एक हजार 1 हजार 573 कर्मचारी हजर झाले आहेत. यामध्ये 325 चालक, 352 वाहक, 476 प्रशासन विभागातील आणि 420 कार्यशाळा विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर 9 एप्रिल रोजी दुपारपर्यंत विभागात 16 कर्मचारी दाखल झाले आहेत. यामध्ये 9 चालक आणि 6 वाहकांचा समावेश आहे, असे प्रशासनाने सांगितले.