बारामतीत वाहतूक शाखेची उत्कृष्ट कामगिरी

 दोन महिन्यात १७ लाख रुपयांचा केला दंड वसूल

जळोची (दिगंबर पडकर) – लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच बारामती शहरात नागरिकांच्या वर्दळीसह दुचाकी चारचाकी वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर विनाकारण फिरणा-या वाहनांवर आळा घालण्यासाठी तसेच वाहतुकीचे नियम मोडणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.आत्तापर्यंत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या कडून दोन महिन्यात तब्बल १७ लाख ५१ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 
 
बारामती शहर करोना मुक्त झाल्यानंतर शहरातील व्यापा-यांच्या मागणीवरून बाजारपेठा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बाजारपेठा सुरू होताच शहरात पुन्हा पूर्वीसारखीच वर्दळ सुरू झाली आहे. या वर्दळीत विनाकारण फिरणा-यांची संख्या वाढू लागल्याने.याला आळा घालण्यासाठी बारामतीच्या वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
 
करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार विना परवाना वाहन चालवणे तसेच नो पार्किंग मध्ये वाहने उभा करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, तसेच ट्रिपल सीट वाहन चालविणा-यांवर दोन महिन्यात तब्बल १७ लाख ५१ हजार ४०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.

यापुढेही वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियम मोडणा-यां बरोबरच वर्दळीच्या रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने पार्क करणा-यांवर दंडात्मक कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे. बारामती शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश चव्हाण, पोलीस नाईक अभिजित कांबळे, पोलीस नाईक अभिजीत ऐकशीगे, महिला पोलीस नाईक धुमाळ, महिला पोलीस नाईक साबळे, पोलीस शिपाई अजिंक्य कदम हे चांगली कामगिरी बजावत आहेत.
 
टाळेबंदीचे नियम शिथिल झाल्यानंतर उत्सुकता म्हणून विनाकारण विनापरवाना फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे विनाकारण फिरणा-यांची संख्या कमी झाली आहे. वाहतुकीचे नियम मोडणा-यांकडून दंडाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. ही कारवाई यापुढे सुरू राहणार आहे.
 
धन्यकुमार गोडसे- (पोलीस निरीक्षक ,वाहतूक शाखा.बारामती)
 

 
      मोटार वाहन कायदा                 केसेस                      दंड                       
१)      विना परवाना वाहन चालविणे           १३५४                    ६,८२,०००
२)     वाहन चालविताना मोबाईल वापर        ३१                  ६२००  
३)     ट्रीपल सीट                           ४५                      ९०००
४)     नो पार्किंग                           ६३९                      १,२७,८००
५)     दारु पिवून वाहन चालविणे              ०१                        २०००
६)      राँग साईट ड्रायव्हिंग                  ०२                        २०००
७)     विना हेल्मेट                         ०१                         ५००
८)     अल्पवयीन पाल्याने वाहन चालिवणे      ०५                        २५००
९)      इतर                              ४००९                       ९,१९,४००
 
एकूण                              ६०८७                     १७,५१,४००     

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.