अहमदाबाद – गुजरातमधील माजी आमदार आणि कॉंग्रेसचे नेते विकास भातोल यांनी आज कॉंग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. गांधीनगरमधील भाजपच्या कमलम या मुख्यालयात झालेल्या समारंभात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गुजरात भाजपचे प्रमुख सीआर पाटील यांनी भातोल यांचे पक्षात स्वागत केले. त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून चूक केली होती आणि मातृ संघटनेत परत येऊन ते सुधारत असल्याचा दावा पाटील यांनी केला.
एप्रिल 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस पक्षाने भातोल यांचे वडील पार्थी भातोल यांना बनासकांथा येथून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठू उमेदवारी दिली होती. त्यानंतर भातोल यांनी भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भातोल यांनी 2009 मध्ये बनासकांठामधील दांता विधानसभेची पोटनिवडणूक भाजपचे उमेदवार म्हणून जिंकली होती.
गुजरातमध्ये या वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.