इस्लामाबाद – पाकिस्तानमधील पंजाब, सिंध आणि कैबर पख्तुन्वा प्रांतात डेंग्यूची प्रचंड ससाथ पसरली आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये आता जागा अपुरी पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या प्रांतातील रुग्णालयांनी डेंग्यूच्या रुग्णांना दाखल करुन ग्यायला नकार द्यायला सुरुवात झाली आहे.
पंजाब प्रांतात कोरोना रुग्णांसाठी राखीव असलेल्या खाटांवरही डेंग्यूच्या रुग्णांना दाखल करुन घ्यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता करोना पाठोपाठ डेंग्यूचे आव्हान उभे ठाकल्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रेवर ताण यायला लागला आहे, असे स्थानिक प्रसिद्धीमाध्यमांनी म्हटले आहे.
डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता राजधानी इस्लामाबादेत डेंग्यू विरोधी मोहिम सुरू करण्यात आली आहे. तर पंजाब सरकारने लाहोर शहरातील सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय आणीबाणी घोषित केली आहे.
पंजाबच्या आरोग्य मंत्री यास्मीन रशिद यांच्या अध्यक्षतेखाली जालेल्या बैठकीमध्या याबाबतचा निर्णय घेण्यात आला. डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी पुढील काही आठवडे पंजाब प्रांतात डासांच्या उत्पत्तीला रोखण्याची मोहिम राबवण्यात येणार आहे.