पॅरिस – टेलिग्राम या मेसेजिंग ऍपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल दुरोव यांना पाच दशलक्ष युरो जामीन देऊन सोडण्यात आले आहे. मात्र त्यांना आठवड्यातून दोनदा पोलिसांकडे हजेरी लावावी लागणार आहे. दुरावे यांच्यावर सहा आरोप असून त्याखाली त्यांची चौकशी केली जाणार आहे. तपासादरम्यान त्यांना फ्रान्स सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
दुरावे यांना शनिवारी रात्री पॅरिसच्या बाहेरील विमानतळावर फ्रेंच पोलिसांनी अटक केली होती. सायबर गुन्हेगार असलेल्या टेलीग्राम वापरकर्त्यांविरुद्ध कारवाई करण्यात अयशस्वी होणे, पेडोफिलिक सामग्री सामायिक करणे आणि दहशतवादाचा गौरव करणे यासह अनेक गुन्हेगारी गुन्ह्यांचा आरोप त्यांच्यावर आहे. मात्र डिजिटल सेवा कायद्यासह युरोपियन युनियन कायद्यांचे पालन केले जात असल्याचे टेलिग्राम समूहाने सांगितले