Ambati Rayudu : भारताचा माजी फलंदाज अंबाती रायुडू राजकारणापासून अलिप्त झाला आहे. राजकारणाच्या खेळपट्टीवर तो दोन आठवडेही टिकू शकला नाही. 28 डिसेंबर रोजी वायएसआर काँग्रेस पक्षात सामील झालेल्या अंबाती रायडू यांनी आज ( 6 जानेवारी ) रोजी राजीनामा दिला. पक्ष सोडत असून अल्पकाळ राजकारणापासून दूर राहण्याची घोषणा त्याने शनिवारी केली. आपल्या अचानक घेतलेल्या निर्णयामागील कारण न सांगता रायडू म्हणाला की तो योग्य वेळी त्याच्या पुढील वाटचालीची घोषणा करेल.
“मी सर्वांना कळवू इच्छितो की मी YSRCP पक्ष सोडण्याचा आणि काही काळ राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे,” असे माजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या क्रिकेटपटूने ट्विटर अर्थात सध्याचे एक्स असलेल्या सोशल मीडियावर लिहिले. पुढील निर्णय योग्य वेळी कळवले जातील असंही त्याने यावेळी स्पष्ट केले.
2023 मध्ये इंडियन प्रीमियर लीग ( IPL ) मधून चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानंतर रायडू निवृत्त झाला, त्याने गेल्या आठवड्यात आंध्र प्रदेशातील सत्ताधारी YSRCP मध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी, उपमुख्यमंत्री के नारायण स्वामी आणि राजमपेट लोकसभा सदस्य पी मिथुन रेड्डी यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षात समावेश करण्यात आला.
अंबाती रायडूला पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची संधी मिळाली आहे. तो 2013, 2015 आणि 2017 मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता. याशिवाय, 2018 आणि 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विजेते झाले तेव्हा तो धोनीसोबत होता.
సీఎం క్యాంప్ కార్యాలయంలో ముఖ్యమంత్రి శ్రీ వైఎస్ జగన్ సమక్షంలో వైఎస్సార్ కాంగ్రెస్ పార్టీలో చేరిన ప్రముఖ భారత క్రికెటర్ అంబటి తిరుపతి రాయుడు.
ఈ కార్యక్రమంలో పాల్గొన్న డిప్యూటీ సీఎం నారాయణ స్వామి, ఎంపీ పెద్దిరెడ్డి మిథున్ రెడ్డి.#CMYSJagan#AndhraPradesh @RayuduAmbati pic.twitter.com/QJJk07geHL
— YSR Congress Party (@YSRCParty) December 28, 2023
अंबाती रायुडूची वनडे कारकीर्द
रायडूने एकदिवसीय क्रिकेटमध्येही भारतासाठी चांगली कामगिरी केली. देशासाठी 55 सामने खेळणाऱ्या अंबाती रायडूने 50 डावात 47.06 च्या उत्कृष्ट सरासरीने 1694 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट ७९.०५ राहिला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने तीन शतके झळकावली.124 धावा ही त्याची सर्वात मोठी धावसंख्या होती. या काळात त्याच्या बॅटमधून 10 अर्धशतकेही झळकली.