भारताचे अमेरिकेला सडेतोड उत्तर
नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी भारताने रशियाकडून अण्वस्त्र खरेदी करण्याच्या निर्णयाला अमेरिकेने विरोध दर्शवला आहे. त्यावरच भारताने अमेरिकेला सडेतोड उत्तर दिले आहे. रशियाकडून आम्ही काय खरेदी करायचे आणि काय नाही हा सर्वस्वी अधिकार आमचा आहे असे परखड मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी व्यक्त केले.
External Affairs Minister S Jaishankar met US Secretary of State Michael Pompeo in Washington DC
Read @ANI story | https://t.co/XmY84NiZIS pic.twitter.com/wbSUnVb1rC
— ANI Digital (@ani_digital) September 30, 2019
अमेरिकेकडून निर्बंध आणण्याच्या धमकीनंतरही त्यांनी रशियाकडून क्षेपणास्त्र शस्त्र प्रणाली विकत घेण्याच्या भारताच्या अधिकाराचा परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी बचाव केला आहे. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोंपिओ यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर भारत रशियाकडून क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा एस -400 खरेदी करण्यास मोकळा असल्याचे म्हटले. तसेच ‘रशियाकडून काय खरेदी करायचं आणि काय नाही, हे आम्हाला कुठल्याही देशाने सांगावे अशी आमची इच्छा नाही. आम्ही नेहमीच असे म्हटले आहे की आम्ही कोणती लष्करी उपकरणे खरेदी करतो हा आपला सार्वभौम हक्क आहे. त्याचप्रमाणे रशियाकडून काय विकत घ्यावे आणि काय नाही हे कुणी सांगावे अशी आमची इच्छा नसल्याचे परखड मत जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केले.