आपला माणूस आमदार होणारच

मांजरीकरांचा निर्धार : योगेश टिळेकरांनी साधला नागरिकांशी संवाद

मांजरी – विकास, कायदा व सुव्यवस्था, भ्रष्टाचारमुक्‍त पारदर्शक शासन हवे असेल तर भाजप-महायुतीशिवाय पर्याय नाही, गल्लीपासून दिल्लीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा जयघोष सुरू आहे. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे मागील 5 वर्षांत हडपसर मतदारसंघात सुरू झालेला विकास पूर्णत्वास न्यायचा असेल तर पुन्हा योगेश आण्णाच आमदार हवा, विकास करण्याची खरी धमक योगेश टिळेकर यांच्यातच आहे.

आमच्या मांजरी भागात अनेक वर्षांपासून वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा रेल्वे उड्डाणपुलाचे काम, पाण्याची योजना, रस्ते आदी विकासकामे मार्गी लावली आहेत, त्यामुळे येत्या 21 तारखेला कमळासमोरील बटन दाबुन पुन्हा एकदा “आपला माणुस आपला आमदार’ व्हावा यासाठी योगेश टिळेकर यांना प्रचंड मताधिक्‍य देऊन विजयी करण्याचा निर्धार मांजरीकरांनी केला.

हडपसर विधानसभा मतदारसंघ भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे उमेदवार आणि भाजप युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश (आण्णा)टिळेकर यांच्या प्रचारार्थ मांजरी येथे पदयात्रा व मतदारांच्या गाठीभेटींचे आयोजन केले होते. त्यावेळी स्थानिक नागरिक बोलत होते.

याप्रसंगी सरपंच शिवराज घुले, उपसरपंच पुरुषोत्तम धारवाडकर, अमित आबा घुले, ग्रामपंचायत सदस्य सुमीत घुले, निर्मला मस्के, नयना बहिरट, संजय धारवाडकर, सुनिता घुले, सुवर्णा कामठे, सिमा घुले, प्रमोद कोद्रे, समीर घुले, उज्ज्वला टिळेकर, बबन जगताप, बाळासाहेब घुले, प्रतीक घुले, नाना म्हस्के, सचिन घावटे, गौरव म्हस्के व मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.

केंद्र व राज्यात भाजप-महायुतीची सत्ता आली त्या दिवसांपासून नवनवीन धोरणे, जनतेच्या हिताची कामे पार पाडण्याचा सपाटा मोदी सरकारने लावला आहे. त्यामुळे गेल्या 50 वर्षांपासून रखडलेला हडपसरचा विकास करण्यासाठी केवळ 5 वर्षांत 7095 कोटी रुपयांचा निधी आणून विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. सर्वसामान्य मायबाप जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. त्यांच्या आशिर्वादाने हडपसरचे नंदनवन केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा ठाम विश्‍वास आमदार योगेश टिळेकर यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.