”तीन महिने झाले हो, आमचा आमदार होता तो, कुठे गेला सध्या तो, गायब झाला हो तो”; शिवसेनेच्या ‘या’ आमदाऱ्याच्या मतदारसंघात झळकले बॅनर्स

मंबई – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मतदार संघ असेलेल्या माजिवाडा भागात अनेक ठिकाणी ‘ओवळा माजिवाडाचे आमदार हरवले, आपण पाहिले का? अशा मजकूराचे बॅनर्स लावल्याचे आज बघायला मिळाले आहे. या बॅनरबाजीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

ठाणे शहरात अनेक ठिकाणी अने बॅनर्स लावण्यात आले आहेत. यामध्ये ‘ओवळा माजिवाडाचे आमदार हरवले, आपण पाहिले का?’ असा मजूकर असलेले बॅनर माजिवाडा भागात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

‘ओवळा माजिवाडा वाऱ्यावर, आमदार कागदावर !’, ‘तीन महिने झाले हो… आमचा आमदार होता तो…,कुठे गेला सध्या तो, गायब झाला हो तो, सामान्य मतदार’ अशा मजकुराचे बॅनर्स ठाण्यात आज झळकल्याचे दिसून आले आहे.

गेल्या तीन महिन्यापासून आमदार सरनाईक हे मतसंघात नसल्याची येथील नागरिकांच्या बॅनर्सवरुन दिसून येत आहे. मतदार संघ वाऱ्यावर सोडून आमदार गायब असल्यामुळे येथिल नागरिकांनी नाराजी व्यक्त करत पोस्टबाजी केली आहे.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सक्तवसुली संचलनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) चौकशी केली होती. त्यांच्या संपत्तीची चर्चाही वाऱ्यासारखी सुरु झाली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.