पाकच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष- बीएसएफ

जैसलमेर: पाकिस्तानने सीमा भागाच्या नजिक काही जमवाजमव सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आम्ही त्या हालचालींकडे लक्ष ठेऊन आहोत आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास आम्ही सिद्ध आहोत असे सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक अमित लोढा यांनी म्हटले आहे.

ते सध्या दोन दिवसांच्या जैसलमेर भेटीवर आले आहेत.ते म्हणाले की सीमा सुरक्षा दलाचा तेथील बंदोबस्त आणखी मजबूत करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या उपाययोजना सध्या केल्या जात आहेत. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.

सीमे नजिक पाकची काही ड्रोन्स आढळून आली आहेत त्या विषयी विचारले असता ते म्हणाले की, आम्हाला तेथील या सगळ्या हालचालींची कल्पना आहे. सीमा भागात राहणाऱ्या लोकांना या संघर्षाचा त्रास होत आहे त्या अनुषंगाने आम्ही तेथे स्थानिक नागरीकांशीहीं समन्वय ठेऊन आहोत असे ते म्हणाले. स्थानिक नागरीकांचा बीएसएफशी समन्वय राहावा म्हणून आम्ही तेथे घर आंगन नावाचा उपक्रम सुरू केला आहे त्याला गावकऱ्यांचा विधायक प्रतिसाद मिळत आहे असेहीं त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.