दहशतवादाच्या विरोधातील आमचा लढा आणखी प्रबळ – सुषमा स्वराज

बिशकेक – श्रीलंकेत झालेला साखळी बॉंम्ब हल्ला आणि पुलवामात सुरक्षा जवानांवर झालेला हल्ला यामुळे दहशतवादाच्या विरोधात लढण्याची आमची मानसिकता आणि निर्धार आता आणखी प्रबळ झाला आहे असे प्रतिपादन भारताच्या विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी केले आहे. शांघाय कार्पोरेशनच्या विदेश मंत्र्यांची परिषद सध्या किरगीजस्तानची राजधानी बिशकेक येथे सुरू झाली असून त्या परीषदेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. शाश्‍वत सुरक्षा व्यवस्थेच्या संबंधात भारत हा शांघाय कोऑपरेशन संघटनेच्या चौकटीत अधिक सहकार्याने काम करील असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या साखळी बॉंम्बस्फोटांमध्ये अनेकांचे प्राण गेले. त्यांच्या प्रति आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती आमची पुर्ण सहानुभुती आहे. आमच्या शेजारील देशामध्ये जेव्हा अशा घटना होतात त्यावेळी आमच्याहीं मनात दहशतवादाच्या विरोधात अधिक खंबीरपणे लढा देण्याची आमची भावना प्रबळ होते. आम्हीही पुलवामा सारख्या गंभीर हल्ल्याचा सामना केला आहे. त्या हल्ल्याच्या आमच्या जखमाही अजून भरलेल्या नाहींत असे त्या म्हणाल्या. आर्थिक आणि व्यापारी क्षेत्रातील सहकार्यही आम्ही या संघटनेच्या माध्यमातून वाढवण्यास उत्सुक आहेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.