लंडन – श्रीलंका व ऑस्ट्रेलियाकडून आमचा पराभव झाला असला तरी आमचे आव्हान संपलेले नाही, असे इंग्लंडचा अष्टपैलू खेळडू बेन स्टोक्स याने सांगितले.
इंग्लंडला अद्याप भारत (30 जून) व न्यूझीलंड (3 जुलै) यांच्याबरोबर सामने खेळावयाचे आहेत. स्टोक्स म्हणाला की, हा विश्वचषक आमचा आहे. आम्ही श्रीलंका व ऑस्ट्रेलियाविरूद्ध खराब फलंदाजीमुळेच सामने गमावले असून या दोन सामन्यांमध्ये झालेल्या चुका पुन्हा होणार नाही अशी मला खात्री आहे. खरतर आमच्याकडे शेवटच्या फळीपर्यंत फलंदाजी आहे. या दोन लढतींमध्ये आम्हाला नशिबाची साथ मिळाली नाही.