नवी दिल्ली – काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांची निवड झाली आहे. या बैठकीदरम्यान राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांचा जोश वाढविताना आक्रमक आणि मजबूत राहण्यास सांगितले आहे. तसेच आमचे ५२ खासदार भाजपविरोधात लढण्यासाठी पुरेसे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राहुल गांधींनी मतदारांचे आभार मानले व पुढे म्हणाले, सर्व काँग्रेस सदस्यांनी लक्षात ठेवायचे आहे कि, आपण संविधानासाठी लढत आहोत. कोणताही भेदभाव न करता प्रत्येक देशवासियांसाठी लढत आहोत. आपल्याला मजबूत आणि आक्रमक राहायला पाहिजे. आपण ५२ खासदार आहोत आणि मी गॅरंटी देतो कि हे ५२ खासदारच भाजपशी इंच-इंच लढण्यासाठी पुरेसे आहेत, असा विश्वास त्यांनी नेत्यांना दिला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे नाराज असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. परंतु, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी समजूत काढल्यानंतरही देखील राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्याचा निर्णयावर अडून बसले आहेत.